प्रवासी बस उलटल्याने दोघे जागीच ठार तर 17 जण जखमी झाल्याची घटना चंद्रपूर (Chandrapur Accident News) जिल्ह्यात घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर-धानोरा (Virur Dhanora Road) मार्गावरुन निघालेल्य बसला अपघात घडल्याने ही घटना घडली. अपघातातील जखमींना नजिकच्या विरुर, राजुरा आणि चंद्रपूर येथी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. काहींची प्रकृती मात्र गंभीर असल्याचे समजते. बस चालवताना चालकाला मध्येच डुलकी आल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी मात्र याला दुजोरा दिला नाही.
अपघात घडताच परिसरातील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरु केले. दरम्यान, पोलिसांनाही घटनेची माहिती मिळाली. पोलिसही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासोबतच अपघाताचा पंचनामाही केला. घटनेची पोलीस दप्तरी नोंद घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, अतिगंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना शासकीय जिल्हा रुग्णायात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, Mahabaleshwar Accident: महाबळेश्वर येथे भीषण अपघात; मुगदेव जवळ 50 मजूरांचा टेम्पो दरीत कोसळला)
चालकाला डुलकी लागल्याने अपघात घडल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरु होती. प्रत्यक्षात मात्र अपघात नेमका कशामुळे घडला याबाबत पोलीस तपास करत आहे. त्यामुळे अपघताचे नेमके कारण काय, याबाबत दुजोरा मिळू शकला नाही. परंतू, अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होतो. रस्त्यावरील वाहतूकीलाही काही काळ फटका बसला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच वाहतूक आणि स्थानिक परिस्थीती स्थिरस्थावर केली. पाठिमागील काही काळापासून बस अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांवर वेळीच उपाययोजना करुन संभाव्य घटना टाळता कशा येतील याबाबत प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.