Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये (Mumbai) आज 1,257 कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची व 55 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह शहरातील एकूण रुग्णसंख्या 1,05,829 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 886 कोरोना विषाणू संशयित रुग्णांची भर्ती करण्यात आली. आज शहरामध्ये कोरोना विषाणूचे 1984 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 77102 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईमध्ये सध्या 22,800 सक्रीय रुग्ण आहेत व आतापर्यंत 5927 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसी (BMC) ने याबाबत माहिती दिली आहे.

आज मृत्यू झालेल्या 37 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 38 रुग्ण पुरुष व 17 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 5 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 36 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 14 रुग्ण 40  ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 72 टक्के इतका आहे. 17 जुलै ते 22 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.14 टक्के राहिला आहे. 22 जुलै 2020 पर्यंत शहरात झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 4,56,511 इतक्या आहेत. सध्या मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 61 दिवस आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज दिवसभरात 9895 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची नोंद, 298 जणांचा मृत्यू; राज्यातील COVID 19 एकूण रुग्णसंख्या 3,47,502)

एएनआय ट्वीट-

शहरातील विविध कोरोना सुविधा केंद्रातील क्षमतेबद्दल बोलायचे झाले तर, 22 जूलै पर्यंत सुविधा केंद्रांमध्ये एकूण खाटांची क्षमता 16811 आहे. आयसीयु बेड्स/व्हेंटीलेटर बेड्सची संख्या 5196/24045 आहे. ऑक्सिजन बेड्सची संख्या 11288 आहे. शहरातील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 22 जुलै नुसार, सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 625 इतकी आहे. तर शहरात 6108 इमारती सीलबंद केल्या आहेत.