Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात आज दिवसभारात 9895 नवे कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्ण आढळून आले. तर 298 संक्रमितांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण कोरोना व्हायरस (COVID 19) संक्रमितांची संख्या 3,47,502 इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 1,36,980 रुग्णसंखेचाही समावेश आहे. तसेच, उपचार घेऊन प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळालेले 1,94,253 जण आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 12,854 रुग्णांचाही समावेश आहे.

दरम्यान, मुंबई शहरातील अत्यंत दाटीवाटीचा परिसर अशी ओळख असलेल्या धारावी येथूनही एक आनंदाची बातमी आहे. धारावी परिसरातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या कमालिची घटत आहे. इतकेच नव्हे तर गेल्या काही दिवसांमध्ये धारावी परिसरामध्ये सापडणाऱ्या कोरोना संक्रमितांची संख्या एकांकी म्हणजेच हाताच्या बोटावर मोजण्यात येईल इतकी झाली आहे. आज दिवसभरात धारावी परिसरात फक्त 6 नवे कोरोना व्हायरस संक्रमित आढळले. या परिसरातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या 2,513 इतकी झाली आहे.

ट्विट

ट्विट

दरम्यान, देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येवर नजर टाकता ती वाढत असल्याचे दिसते. देशभरात आजघडीला 1238635 इतकी एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची नोंद आहे. उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 782607 इतकी आहे. तर प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 426167 इतकी आहे. आतापर्यंत 29861 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.