Exorbitant Electricity Bills: सामान्य नागरिकांना वाढीव वीजबिलांतून तत्काळ दिलासा द्यावा; देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारला विनंती
Devendra Fadnavis | Image only representative purpose (Photo credit: File Image)

लॉकडाऊन काळात अवाजवी भरमसाठी बीजबिल (Exorbitant Electricity Bills) पाठविण्यात आल्याची ओरड चांदा ते बांदा, अशी संपूर्ण महाराष्ट्रभरात (Maharashtra) सुरु आहे. त्यातच बिलविषयक तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याने जनमानस प्रक्षृब्ध आहे. एकाकडे लॉकडाऊन आणि कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे रोजगार बुडाले आहेत. तसेच हाताला काम नसल्याने जगायचे कसे? असाही प्रश्न अनकांपुढे पडला आहे. याचपार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वाढीव वीजबिलसंदर्भात राज्य सरकारला विनंती केली आहे. सामान्य नागरिकांना वाढीव वीजबिलांतून तत्काळ दिलासा द्यावा, असे फडणवीस ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

कोरोनाच्या काळात समाजातील अनेक घटक आर्थिक संकटात असताना एकाही घटकासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. मदत करू शकत नसाल, तर किमान त्यांच्यावर आर्थिक भूर्दंड तरी लादू नका. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, सामान्य नागरिकांना या वाढीव वीजबिलांतून तत्काळ दिलासा द्यावा, असे अशायाचे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चिंताजनक; विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

मात्र, नागपूरमध्ये लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचं वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सामान्यांपासून ते थोरामोठांपर्यंत सर्वांनाच वीजबिल पाहून मोठा धक्का बसला आहे. वीजबिलावरून अनेक राज्यात ठिकठिकाणी अंदोलने झाली आहेत. तसेच कोरोनाचा धोका पत्करून सर्वसामान्यांनी रांगा लावल्या आहेत. पण, त्यांना न्याय मिळाला नाही. यामुळेच लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले. मात्र आता तरी सरकारला जाग येईल का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.