Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रात एकीकडे उकाडा दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. दरम्यान येत्या 3 ते 4 तासांत पुणे (Pune), नंदुरबार (Nandurbar), धुळे (Dhule), जळगाव (Jalgaon) आणि सातारा (Satara) या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्या शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

मागील आठवड्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. काल लातूर, परभणी, जालना, औरंगाबाद, सोलापूर या जिल्ह्यांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यात आज देखील पुण्यासह सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Rain Update: राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; उद्याही काही जिल्ह्यात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज

सातारा, नंदुरबार, धुळे, जालना, पुणे आणि जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून येथील स्थानिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. काल पडलेल्या अवकाळी पावसामुळे औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील केळी आणि द्राक्षांच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

पुढील 3 ते 4 तासांत धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे आणि सातारा या जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळणार आहेत, अशा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.

एकीकडे लॉकडाऊनची टांगती तलवार असताना अशा अवकाळी पावसाने बळीराजाचे प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे चिंतेने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

पुढील काही दिवस राज्यातील हवामानाची स्थिती कायम राहणार आहे. तर विदर्भासहित मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. पुढील 3 ते 4 तासांत धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे आणि सातारा या जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळणार आहेत, अशा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.