श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाताना मुंबईतील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. ही घटना आज अक्कलकोट शहराजवळ सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. (हेही वाचा - नगर-इंदूर महामार्गावर अपघात; खड्डे चुकवताना पुणे-अक्कलकुव्वा एसटी बस पलटी, बसमधील प्रवासी जखमी)
या अपघातामध्ये मुंबईतील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रक व कारची समोरासमोर धडक झाली. या अपघाताची माहिती मिळताच अक्कलकोटच्या पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. हा अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अद्याप अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
हेही वाचा - गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन; अमेरिकेहून घरी परताना मुंबई-नाशिक महामार्गावर अपघाती मृत्यू
राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा 14 नोव्हेंबर मुंबई- नाशिक महामार्गावर भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला होता. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून नाशिकला त्यांच्या मूळ घरी परताताना रस्त्यामध्येच काळाने त्यांच्यावर घाला घातला. एका टॅंकरला झालेल्या धडकेमध्ये गीता यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. यामध्ये गीता माळी यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पतीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.