Buldhana Accident: बुलढाणा येथे टँकर आणि मोटारसायकलच्या भीषण अपघात; एकाच कुटुंबियातील तिघांचा मृत्यू
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

टँकर आणि मोटारसायकलच्या भीषण अपघात एकाच कुटुंबियातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात बुलढाणा (Buldhana) येथील मेहकर (Mehkar) तालुक्यात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा तपास करत आहेत. सध्या पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच अपघाती वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

अब्दुल जब्बार अब्दुल रज्जाक (65), त्यांची पत्नी जमीला बी अब्दुल रज्जाक (58) आणि नातू म. हाशिम (वय, 12) सर्व रा. सळणीपुरा, पातूर) अशी मृतांची नावे आहेत. मृतक अकोला जिल्ह्यातील पातूर येथील रहवाशी असून साखरखेरडा येथे आपल्या मुलीला भेटायला जात असताना मेहकर तालुक्यातून नागपूर– मुंबई मार्गावरील नागापूर गावाजवळ दोन ट्रक आणि एम 80 मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. ज्यात अब्दुल, जमीला आणि त्यांचा नातू हाशिमचा जागीचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा-वसई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेनरची एकमेकांना जोरदार धडक, अपघातात 2 जणांचा बळी

बुलढाण्यात तीन दिवसांपूर्वी एका भरधाव स्कॉर्पिआच्या धडकेत रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या बाप-लेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अपघाताचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे