वसई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेनरची एकमेकांना जोरदार धडक, अपघातात 2 जणांचा बळी
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर  (Mumbai-Ahamedabal Highway) विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. ही घटना वसई येथे घडल्याचे समोर आले आहे. आज सकाळी हा अपघात घडला असून यामध्ये दोन वाहन चालकांचा जगीच मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दुर्घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली त्यानंतर मृतांची ओळख पटलेली नाही. हा अपघात सकाळी 5.45 वाजता सुवी पॅलेसवजळ घडला आहे.

कंटेनरच्या माध्यमातून कंस्ट्रक्शन संबंधित सामान गुजरातच्या दिशेने नेले जात होते. कंन्टेर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे. धडक लागल्यानंतर समोरील गाडी मुंबईच्या दिशेच्या बाजूने उडाली.(Mumbai Traffic Jam: क्रेन अपघातामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी)

वाहन डिवाइडरवरुन वेगाने पुढे जात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला धडकले. यामध्ये दोन जणांचा बळी गेला आहे. तर एका कंटेनर मधील व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. पण दोन्ही चालकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Aurangabad: मद्यधूंद 'ती' बेधुंद झाली, कुख्यात गुंडासोबत कारवर नाचली; औरंगाबाद येथे कायद्याची पायमल्ली जनतेने भररस्त्यात पाहिली)

याआधी मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर लोणावळा घाटात अपघात झाला होता. त्यावेळी दुर्घटना झालेल्या वाहन चालकाच्या मदतीस कोणीच पुढे आले नाही. पण तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दखल घेत अपघातग्रस्तांची मदत केली.