मुंबई: गोवंडी येथे सेप्टिक टॅंक मध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यु
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

आज, 23 डिसेंबर रोजी गोवंडी (Govandi)  परिसरात एका सेप्टिक टॅंक मध्ये स्वच्छता  करत असताना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर येत आहे. रहेजा कॉम्पलेक्स (Raheja Complex) पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशवाडी (Ganeshwadi)  येथे ही घटना घडली असून हे तिघेही मजुरी कामगार होत असल्याचे समजतेय. मुंबई मिरर, च्या माहितीनुसार, हे कामगार गुदमरून बेशुद्ध होताच त्यांना स्थानिकांकडून तातडीने शताब्दी रुग्णालयात (Shatabdi Hospital)  नेण्यात आले होते, मात्र रुग्णालयापर्यंत पोहचातच या कामगारांनी प्राण सोडले होते. यानंतर डॉ. राठोड यांनी त्यांना मृत घोषित केले. संबंधित मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. धक्कादायक! पुण्यातील ससून रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल

 

यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारच्या नाक घटना मुंबई व लगतच्या परिसरातून समोर आल्या होत्या, यामध्ये मे महिन्यात ठाणे येथे तर त्यापाठोपाठ लगेचच चेंबूर व नालासोपारा येथे असे मृत्यू झाले आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, खाजगी मजुरीचे कामगार हे अशा कामाचे प्रशिक्षण घेतलेले नसल्याने त्यांना सुरक्षित काम करण्याबाबत फार माहिती नसते, किंबहुना म्हणूनच अशा प्रकारचे प्रसंग ओढवतात, यामुळे जेव्हा अशा प्रकारची कामे करायची असतील तेव्हा अधिकृत मान्यताप्राप्त व्यक्तींनाचा जबाबदारी देण्यात यावी असे आवाहन पालिकेने ठाणे येथील घटनेनंतर केले होते.