People fallen in septic tank at Chembur (Photo Credits-ANI)

मुंबईतील चेंबूर (Chembur) येथील रस्त्यालगतच्या खड्ड्यात 2-3 जण पडल्याची घटना बुधवारी (3 एप्रिल) घडली आहे. यामधील एका व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र अद्याप अन्य दोन जणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

म्हाडा कॉलनी वाशी नाका येथे ट्रकच्या सहाय्याने खड्डा भरुन काढण्याचे काम सुरु होते. त्याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या तिघांना त्याची धडक लागल्याने ते तिघे खड्ड्यात पडले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचले आहेत. (हेही वाचा-भिवंडी: PUBG गेम खेळण्यावरुन आई रागवल्याने 17 वर्षीय मुलाने घर सोडले)

ANI ट्वीट:

तर अद्याप खड्ड्यात अडकलेल्या महिलेला आणि मुलाला बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरु असल्याचे सांगितले जात आहे. तसेच परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून या ठिकाणापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.