एका तरुणाची हत्या करून त्याच्या मृतदेह नदीत फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune) (Pimpri Chinchwad) येथे घडली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सोमवारी तीन जणांना अटक केली आहे. चारपैकी तीन आरोपींची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे आणि युनिट 5 चे पोलिस नाईक दत्तात्रय बनसोडे यांना मिळाली. त्यानुसार, अनिकेत उर्फ टायगर बाबाराव शिंदे, पवन किसन बोरोले आणि महेंद्र विजय माने या तिंघाना अटक केली असून चौथ्या आरोपीचा शोध सुरु आहे.
देहूरोडच्या सांगुर्डी फाटा भागातून या तिघांना अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने दिलेल्या निवेदनात आरोपीने सुरुवातीला पोलिसांना सहकार्य करण्यास नकार दिला. मात्र, चौकशी दरम्यान आणखी एका आरोपीचा यात समावेश असल्याचे पोलिसांना समजले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी इंद्रायणी नदीकाठी शेतात राहतात. गेल्या गुरूवारी दारूवरून आरोपी आणि मृत व्यक्तीमध्ये किरकोळ वाद झाला होता. मात्र, शुक्रवारी सायंकाळी या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी मृत व्यक्तीला मारहाण करून त्याचे हातपाय बांधून त्याला इंद्रायणी नदीत फेकले. हे देखाली वाचा- 'हिजडा' शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल; निलेश राणे यांना Gender Activist सारंग पुणेकर यांनी सुनावले
देहूरोड पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खून) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथे घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का दिला आहे.