'ज्यांना रामजन्मभूमी संघर्षात साधे खरचटलेही नाही, ते पुढे पुढे होऊन निर्णय घेत आहेत'- संजय राऊत
Shiv Sena MP Sanjay Raut | (File Photo)

अयोध्येत (Ayodhya) राम मंदिर भूमिपूजनाचा (Ram Temple Bhumi Pujan) सोहळा आज मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र या कार्यक्रमाला अनेक नेत्यांना व पक्षांना निमंत्रण नव्हते. अशात शिवसेना  (Shiv Sena) आणि उद्धव ठाकरे यांनाही यातून वगळले होते. त्यानंतर आता भूमिपूजनाला आमंत्रित न केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी  नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी ते म्हणाले, ही फार खेदजनक बाब आहे, की रामजन्म भूमी संघर्षात ज्या लोकांना साधे खरचटलेही नव्हते ते लोक या विषयावर सर्वात पुढे पुढे येऊन निर्णय घेत आहेत.

संजय राऊत यांनी न्यूज 18 ला सांगितले, 'भगवान रामच्या नावावर राजकारण केले जात आहे. काय केले जाऊ शकते? या मुद्द्यावर राजकारण झाले नसते तर, लोकांनी भगवान राम यांच्या नावावर मते मागितली नसती तर, पण ते अशी मते मागतात. आजच्या दिवसाबद्दल शिवसेने म्हटले की, हा एक ऐतिहासिक दिवस आणि ऐतिहासिक क्षण आहे कारण हिंदूंची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण होत आहेत.'

पक्षप्रमुखांना का आमंत्रित केले गेले नाही असे विचारले असता राऊत म्हणाले की, 'संघर्षात ज्यांनी प्रमुख भूमिका बजावली त्यांना अतिथींच्या यादीत समाविष्ट केले नाही. कल्याणसिंग, लालकृष्ण अडवाणी, नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी जी या सर्वांनी राम मंदिर निर्मितीच्या संघर्षासाठी मोठे योगदान दिले होते. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे अतिथींची यादी फारच लहान ठेवली गेली आहे, असे आयोजकांनी सांगितले.' (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न; चांदीची वीट रचून मोदींनी केली रामजन्मभूमीची पायाभरणी)

याबाबत सामना संपादकीयात असे म्हटले आहे की, 'बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करणाऱ्या शिवसैनिकांची बाब मान्य केल्यावर बाळासाहेब ठाकरे हिंदूह्रदयसम्राट झाले होते. ते म्हणाले होते, ज्या सैनिकांनी हे केले त्यांचा मला अभिमान आहे. परंतु, आज या बाबरी मशीद विध्वंसात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेला आमंत्रण देण्यात आले नाही. रंजन गोगोई यांनाही आमंत्रित केलेले नाही. हा ऐतिहासिक सुवर्ण मुहूर्त आहे आणि कारसेवकांचा त्याग विसरता येणे शक्य नाही.'