(Photo Credit: Twitter/ ANI)

अनधिकृत फेरीवाल्यानंतर कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजिवाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर अमरजीत यादव नावाच्या एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात कल्पिता पिंगळे यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेवर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच फेरीवाल्यांविरोधात याधाही आक्रमक भुमिका घेतलेल्या मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. जर फेरीवाले अशाप्रकारे वागत असतील आणि एका अधिकाऱ्यावर जिवघेणा हल्ला करत असतील तर, त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भिती वाटली पाहिजे, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर फेरीवाल्याकडून झालेल्या हल्ल्यावर बाळान नांदावकर म्हणाले की, "फेरीवाले अशाप्रकारचे वागत असतील किंवा अधिकाऱ्यांवर अशाप्रकाचे हल्ले करीत असतील, त्यांच्या मनात भिती निर्माण झाली पाहिजे. ज्यांना शासनाची भीती वाटत नाही, त्यांना राज ठाकरे यांची भिती वाटली पाहिजे. या घटनेविरोधात सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे, नाहितर, आम्ही कठोर होणार!", असा इशाराही त्यांनी दिला आहे. हे देखील वाचा- Ashok Chavan: सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेकडून दगडफेक

नेमके काय घडले?

ठाणे महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. याचदरम्यान, ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी सोमवारी सायंकाळी 6.30 सुमारास कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजी विक्रेता अमरजीत यादवची गाडी जप्त केली. यावर संतापलेल्या अमरजीत सिंहने कल्पिता पिंगळे यांच्यावर हल्ला कल्पिता पिंगळे यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली.

या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या दिवशी या घटनेतील आरोपी पोलिसांकडून सुटेल, त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोट छाटली जातील. फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, अशा इशारा राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांना दिला होता.