अशोक चव्हाण (Photo Credit: PTI)

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नांदेड (Nanded) येथील घरावर एका अज्ञात महिलेने दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. आज बुधवारी (1 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. दगडफेक करणारी महिला कोण होती याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, ही महिला मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस (Shivajinagar Police) अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक चव्हाण यांच्या घरावर आज सकाळी एका अज्ञात महिलेने दगडफेक केली होती. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र, तो पर्यंत संबंधित महिला घटनास्थळावरून पसार झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक करणारी महिला मनोरुग्ण असल्याचे समजत आहे. दगडफेकीच्या या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास केला जात आहे. हे देखील वाचा- Maharashtra Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट; शिवसेना, काँग्रेस पक्षाबाबत घेतला हा निर्णय

दरम्यान, ज्यावेळी या महिलेने दगड भरकावण्यास सुरुवात केली, त्यावेळी सुरक्षारक्षकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरीही ही महिला दगडफेक करणे सुरुच ठेवले. महिलेने फेकलेला एक दगड सुरक्षा रक्षकांच्या केबिनवर लागला. ज्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या कबिनची काच फुटल्याची सांगितले जात आहे.