महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra Local Body Elections) आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची एक महत्त्वची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सह्याद्री अतिथिगृहावर पार पडलेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थीत होते. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थां निवडुकांसंबंधी कोणत्या ठिकाणी स्वबळ आणि कोणत्या ठिकाणी शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress ) पक्षासोबत आघाडी करायची याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीबाबत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली. नवाब मलिक यांनी माहिती देताना सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष स्वबळावर लढेण. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की शिवसेना आणि काँग्रेस पक्षांसोबत आघाडी होणार नाही. राष्ट्रवाती काही ठिकाणी स्वबळावर आणि आवश्यकता असलेल्या दोन-तीन ठिकाणी शिवसेना, काँग्रेस या पक्षांसोबत आघाडी करुन लढेन. (हेही वाचा, Jayant Patil: 'राजकारणाचा स्तर घसरला नाही, काही लोकांचा स्तर घसरला आहे'; जयंत पाटील यांचा नारायण राणे आणि भाजपला टोला)
पुढच्या वर्षी मुंबईसह 223 महानगरपालिका, नगरपालिका, राज्यभरातील जवळपास 25 जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी काही ठिकाणी मित्रपक्ष आणि काही ठिकाणी स्वबळ असा फंडा वापरुन निवडणूक लढविण्याचा राष्ट्रवाती काँग्रेस पक्षाचा विचार आहे. याबाबतच या बैठकीत निर्णय झाला. याशिवाय महामंडळांच्या वाटपाबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत करण्यात आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आदींना महामंडळ वाटपामध्ये कसे स्थान असावे याबाबत या बैठकीत निर्णय झाला.