शिवसेनेच्या आक्रमक रणनीतीमागे आहे 'हा' चेहरा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील त्यांच्याच सल्ल्याचा झाला होता फायदा
Shivsena (Photo Credits: File Image)

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची महायुती असूनही शिवसेनेने मात्र भाजपविरुद्ध बंड पुकारला आहे. मुख्यमंत्री पदाच्या आग्रहापोटी त्यांची आक्रमक भूमिका पाहून राजकीय वर्तुळात सर्वत्र आश्चर्याचं वातावरण आहे.

मागील निवडणुकांप्रमाणेच याहीवेळी शिवसेना अखेरीस भाजपशी तडजोड करून महायुतीचं पुन्हा सरकार आणणार अशा आधी चर्चा होत्या. परंतु शिवसेनेने मात्र आक्रमक पवित्र घेत भाजपविरुद्ध लढा सुरु केला. यातही विशेष ठरलं ते म्हणजे सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने विरोधी विचारांच्या काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी हात मिळवणी केली. पण शिवसेनेच्या या आक्रमक भूमिके मागे खरा हात कोणाचा, याचा उलगडा आज आम्ही करणार आहोत.

शिवसेना पक्षाच्या नव्या रणनीतीमागे निवडणुकीतील चाणाक्य संबोधले जाणारे प्रशांत किशोर असल्याचं टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. आतापर्यंतचा राजकारणाचा इतिहास पाहता प्रशांत किशोर यांच्या निवडणूक रणनीतीचा परिणाम अनेक ठिकाणी पाहायला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नीतीश कुमार-लालू यादव युती, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि जगन मोहन रेड्डी अशा अनेक राजकारण्यांना प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा फायदा झाला आहे. हे कितीही खरं असलं तरी महाराष्ट्रात मात्र त्यांच्या रणनीतीची जादू म्हणावी तशी यशस्वी ठरली नाही.

शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. भाजपमधील अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेवर यासाठी टीका देखील केली आहे. परंतु काहीही झालं तरी सेने मात्र यावेळी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर ठाम आहे हे नक्की.

Maharashtra Government Formation Live News Updates  

दरम्यान शिवसेनेच्या या ठाम निर्णयामुळे महाराष्ट्रात अजूनही कोणताही राजकीय पक्ष सत्ता स्थापन करू शकलेला नाही. इतकंच नव्हे तर याच कारणामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट देखील कालपासून लागू करण्यात आली आहे.