कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामधील बैठक अचानक रद्द झाली आहे. आज मुंबईत अशोक चव्हाण यांच्या कार्यालयात बैठक होती. मात्र अचानक ही मिटिंग रद्द झाली आहे. अजित पवार हे बारामतीला निघून गेले आहेत तर यामध्ये वाद नसल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रात अमित शहा यांनी शिवसेना - भाजपाच्या तणावर पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे आधीच ठरलं होतं तेव्हा शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही? असे अमित शहा म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेमधील राजकीय पेच प्रसंग  सोडवण्यासाठी चर्चांना सुरूवात झाली आहे. आज कॉंग्रेस  आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये चर्चा करण्यास सुरूवात झाली आहे. या बैठकीला दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती आहे. या बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्राम वर चर्चा होण्याची शक्यता आहे.  

गेली काही दिवस जयपूर येथे निवासस्थानी असलेले काँग्रेस आमदार अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे सरकार अस्तित्वात येण्याचे नक्की झाल्यानंतर हे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली बैठक ही एक सदिच्छा बैठक होती. विविध विषयांवर आम्ही चर्चा करत आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्ही एकत्र चर्चा करणार आहोत. त्यांनतर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन चर्चा करतील आणि मग निर्णय कळवण्यात येतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बळासाहेब थोरात यांनी दिली.

काँग्रेस नेत्यांची हॉलेट ट्रायडंट येथे सुरु असलेली बैठक संपली आहे. अशोक चव्हाण, पृथ्विराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांच्यात किमान समान कार्यक्रम ठरला आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुख आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक हॉटेल ट्रायडंट येथे नुकतीच पार पडली. ही बैठक पार पडल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, किमान समान कार्यक्रमावरती चर्चा झाली आहे. चर्चा योग्य दिशेने सुरु झाली  आहे. महाराष्ट्राच्या जनतेला लवकरच अंतिम निर्णय कळेल.

शिवसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्यात सुरु असलेली हॉटेल ट्रायडंट येथील बैठक संपली आहे. आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक सुरु झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत काय चर्चा होते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत काँग्रेस, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येत 24 कलमी कॉमन मिनिमम प्रोग्राम (Common Minimum Program) तयार केला आहे. लवकरच हा कार्यक्रम जाहीररित्या सांगण्यात येईल. तसेच, या कार्यक्रमात नव्याने काही मुद्दे समाविष्ट करण्यासाठी तसेच, काही मुद्द्यांमध्ये बदल करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना लीलावती हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रक्तवाहिन्यांमधील ब्लॉक मुळे त्यांना एकाएकी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर लगेचच त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आज डिस्चार्ज घेऊन ते रुग्णालयातून बाहेर पडले आहेत.  बाहेर येताच माध्यमांसमोर त्यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याची पुन्हा घोषणा केली.

Load More

Maharashtra Government Formation Live News Updates: महराष्ट्रातील सत्तासंघर्ष न थांबल्याने कोणत्याच पक्षाला बहुमताचा आकडा घेऊन सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. परिणामी सरकार स्थापन झालेच नाही. त्यामुळे अपेक्षीतरित्या सर्व सूत्रे राज्यपालांच्या हातात गेली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचे अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान हालचाली घडू लागल्या आहेत. शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस(Congress), भाजप (BJP), मनसे (MNS) या हालचालींच्या क्षणाक्षणाच्या या ताज्या घडामोडी आमच्या वाचकांसाठी.