संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क साधला; महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडण्याची शक्यता
Ajit Pawar And Sanjay Raut (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले तरीदेखील राज्यात सरकार स्थापन झाली नाही. भाजप- शिवसेना यांच्या युतीत मुख्यमंत्री पदावरुन राजकीय सुरु वाद सुरु झाला आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संपर्क साधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरु होती. त्यामुळे अजित पवार यांना संजय राऊत यांच्या मेसेजला प्रतिसाद देता आला नाही, अशी माहिती अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. परंतु, काहीवेळेने संजय राऊत यांच्याशी फोनच्या माध्यमातून संपर्क साधणार असल्याचेही अजित पवार म्हणाले आहेत.

महायुतीत वाद सुरु झाल्यानंतर शिवसेना पक्षाने आक्रमक भुमिका घेतली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली होती. या निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळाल्या असल्या तरीदेखील त्यांना शिवसेना पक्षाची गरज भासत आहे. यामुळे शिवसेना पक्षही एकमतावर ठाम राहिला आहे. यातच संजय राऊत यांचा अजित पवार यांना मॅसेज केल्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ज्यावेळी अजित पवार यांना मॅसेज आला त्यावेळी ते बैठकीत होते. यामुळे संजय राऊत यांच्या मॅसेजला प्रतिसाद देता आला नाही. तसेच मेसेजचा अर्थ काय लावायचा हे त्यांच्यासोबत बोलल्याशिवाय समजणार नाही, असेही अजित पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- शिवसेना पक्षाचे संख्याबळ वाढले असून उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आलेत- संजय राऊत

एएनआयचे ट्विट- 

एकीकडे भाजप-शिवसेना यांच्या वाद सुरु आहे. तर दुसरीकडे संजय राऊत हे शरद पवार यांचे कौतुक करताना दिसले आहे. तसेच महाराष्ट्रात कोणाची सत्ता स्थापन होणार हे येत्या काही दिवसातच जनतेला कळणार.