Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

चारित्र्याच्या संशयावरुन अल्पवयीन (वय वर्षे-17) मुलाने केलेल्या कुऱ्हाडीच्या हल्यात 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सुनिता सुनिल घोघरा (वय 36 वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. त्या वसईच्या माजिवली देपिवली ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्य होत्या. धक्कादायक म्हणजे सुनिता यांच्यावर त्यांच्याच पोटच्या मुलाने हा हल्ला केला. ज्यात घाव वर्मी लागल्याने गळा चिरला गेला आणि त्यांचा मृत्यू झाला. मृत महिला आपल्याच कुटुंबासोबत गावात राहात होती. तिचे परिसरातीलच एका व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय तिच्या मुलाला होता. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या हत्येची घटना रविवारी (20 ऑगस्ट) रात्री 10 वाजताच्या सुमारास वसई तालुक्यातील देपीवली गावात घडली. मृत सुनिता घोगरा या वालीव परिसरात नोकरी करत असत. रविवारी त्यांना साप्ताहीक सुट्टी होती. त्यामुळे पूर्ण दिवस त्या घरीच होत्या. दरम्यान, रात्रीच्या वेळी त्यांनी जेवण केले आणि आपल्या खोलीत झोपण्यास गेल्या. थोड्या वेळाने त्यांचा पती घरी आला तेव्हा त्यांना आपली पत्नी (सुनिता) गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढलले. पतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारपापूर्वीच मृत गोषीत केले.

दरम्यान, सदर घटनेची नोंद मांडवी पोलिसात करण्यात झाली. पोलिसांनी उपलब्ध माहिती, पुराव्यांच्या आधारे पती अटक केली. त्याच्याकडे चौकशी सुरु असतानाच त्यांच्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले. या वेळी आपणच आईची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. चारित्र्याच्या संशयातूनच आपण ही हत्या केल्याचेही त्याने पोलिसांकडे कबूल केले.

मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याने गावभर खळबळ उडाली आहे. मुलाने असे कृत्य करावे याबाबत आश्चर्य व्यक्त होतानाच गावकऱ्यांमध्ये घबराटीचेही वातावरण आहे. धक्कादायक म्हणजे ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेसोबतच हे कृत्य घडल्याने मोठ्या प्रमाणावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसऱ्या बाजूला गावामध्ये दबक्या आवाजात वेगवेगळ्या चर्चाही ऐकायला मिळत आहेत.