Maharashtra: राज्यातील कोरोनाची तिसरी लाट ओसरत चाललीय-आरोग्यमंत्री राजेश टोपे
Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

Maharashtra: राज्यातील कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी म्हटले आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर येथील रुग्णांचा आकडा सुद्धा कमी होत आहे. कोरोनाच्या काळात दुसऱ्या लाटेनंतर आलेल्या तिसऱ्या लाटेवेळी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. परंतु आता रुग्णांचा आकडा घटत असल्याने म्हणू शकतो की कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालली आहे. परंतु राज्यातील अद्याप काठी ठिकाणी रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे ही टोपे यांनी म्हटले.(Schools & Colleges Reopen in Pune: पंधरा ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळेतच लसीकरण, पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरु- अजित पवार)

परंतु नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद येथील शहरात अद्याप ही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. परंतु घाबरण्याची काही गरज नाही आहे. कारण संक्रमण झालेल्या व्यक्ती 5-7 दिवसात बरे होत आहेत. यासाठी साधारण औषधे आणि उपचार घेत असल्याचे ही टोपे यांनी सांगितले.(Maharashtra Covid-19 Vaccination: महाराष्ट्रातील 50 टक्के मुलांना मिळाला लसीचा पहिला डोस, मुंबईची स्थिती गंभीर) 

राजेश टोपे यांनी पुढे असे म्हटले की, कोविड19 पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी होत चालला आहे. आपल्या येथे 47 हजार दररोज रुग्ण आढळून येत होते. मात्र ही आकडेवारी 25 हजारावर आली आहे. तसेच रुग्णालयाती 92-95 टक्के बेड हे रिकामे असून एक टक्के लोकच आयसीयू, आॉक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर आहेत. सध्या राज्यात 2,70,444 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 72,42,649 जणांनी कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत. तर एकूण 1,42,461 जणांचा बळी गेला आहे.