Fire प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य- Pixabay)

Bank Fire In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मधील वैजापूर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चोर चोरी करण्याच्या उद्देशाने बँकेत घुसले. पण ते चोरी करू शकले नाहीत. चोरट्यांनी बँकेत चोरी करण्यासाठी गॅस कटर (Gas Cutter) चा वापर केला. परंतु, गॅस सिलिंडरचा स्फोट (Gas Cylinder Explosion) झाला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बँकेत स्फोट होताच, चोरांनी सर्वस्व सोडून जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. या स्फोटामुळे संपूर्ण बँक जळून खाक झाली.

छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर गावातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत चोरांनी गॅस कटरचा वापर करून चोरी केली, त्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि शाखा जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज पहाटे 3.30 किंवा 4 वाजताच्या सुमारास घडली. बँकेत स्फोट होताच परिसरात धुराचे लोट पसरले. हे भयानक दृश्य पाहून चोर घाबरेल आणि पळून गेले. (हेही वाचा -Fire at Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरातील सेंट्रल नाका मार्केटमध्ये भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक (Watch Video))

दरोड्यात वापरलेली कार बँकेबाहेर लावून चोर लंपास -

स्फोटामुळे चोर घाबरले आणि घाईघाईत ते त्यांचे वाहनही घटनास्थळावरून घेऊन जाण्याचं विसरले. दरोड्यात वापरलेली कार बँकेबाहेर उभी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस चोरांचा शोध घेत आहेत.   (हेही वाचा - Bus Catches Fire in Hinjawadi IT Park: हिंजवडी आयटी पार्क परिसरात बसला आग, चौघांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी)

ठाण्यात इमारतीच्या वीज मीटरला आग -

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात एका सात मजली निवासी इमारतीच्या वीज मीटरला भीषण आग लागली, ज्यामुळे 95 मीटर जळून खाक झाले. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, संपूर्ण इमारतीत धूर पसरला होता, त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती.