2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षणसंस्थांनी फी वाढ करु नये; कोरोना व्हायरस संकटात राज्य सरकारचा पालकांसाठी दिलासादायक निर्णय
File image of school children | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने पालकांना दिलासा दिला आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ करण्यात येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचबरोबर 2019-20 या शैक्षणिक वर्षाची बाकी असलेली फी देखील माफ केली जाणार आहे. विशेष म्हणजे  पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजेच (2020-21) मध्ये फी भरण्यासाठी मासिक किंवा त्रैमासिक (Monthly/Quarterly) असा पर्याय पालकांना देण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र शिक्षण विभागाने दिली आहे. (राज्यातील सर्व शाळांतील वर्ग सुरू होईपर्यंत पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये - वर्षा गायकवाड)

यापूर्वी कोरोना व्हायरसमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात शाळांनी पालकांकडे फी साठी तगादा लावू नये, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले होते. शाळेचे वर्ग सुरु होईपर्यंत फी घेण्यात येऊ नये असे निर्देश शाळांना देण्यात आले होते. मात्र वाढलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य सरकारने पालकांसाठी दिलासादायक निर्णय दिला आहे.

ANI Tweet:

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे महाविद्यालय, विद्यापीठांच्या परिक्षा त्याचबरोबर इतर स्पर्धा परिक्षा आणि सीईटी परिक्षा लांबणीवर पडल्या होत्या. त्याबाबतचा गोंधळ उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दूर केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार केवळ अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परिक्षा होणार असून इतर विद्यार्थ्यांना परिक्षा न घेता पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे.