Maharashtra Weather Update (Photo Credits: Twitter)

गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांत लागलेली थंडीची चाहुल अचानक कमी होऊन तापमानात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे एकाएकी थंडीत गरमी जाणवू लागली. थंडीत असे वातावरण कुणालाच सहसा रुचत नाही. मात्र आज सकाळपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा शिडकाव झाल्याने वातावरणात छान गारवा आल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे नागरिकही या वातावरणाचा छान आनंद घेताना दिसत आहे. काही ठिकाणी आज पहाटेपासूनच हवेत छान गारवा आल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरीही मेघगर्जनेसह वादळाची धुसर शक्यता वर्तविली आहे.

मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 3 तासांपासून मुंबईसह कोकणातील अनेक भागात समाधानकारक हवामान असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पावसाची जरी शक्यता नसली तरीही मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह अनेक जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह धुसर पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Weather Forecast Today: ढगाळ वातावरणात मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी, थंडीच्या दिवसात अवकाळी

अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. सध्या हिवाळा सुरु आहे. परंतू, हिवाळ्यात पाऊस पडल्याने महाराष्ट्रात एक विचित्रच वातावरण पाहायला मिळाले. या वातावरणामुळे प्रामुख्याने शेतीला फटका बसण्याची चिन्हे आहेत. दरम्यान आज महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. गुजरातच्या वडोदरा भागातही आज सकाळी पावसाचा शिडकाव झाला.