Maharashtra Weather Forecast Today: ढगाळ वातावरणात मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी, थंडीच्या दिवसात अवकाळी
Cloudy Weather | Representational Image (Photo Credits: Pixabay)

ढगाळ वातावरणासह राज्यातील (Cloudy Weather In Maharashtra) काही ठिकाणी आज तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी अवकाळीने हजेरी लावली. मुंबई शहरात तुरळक पावसाच्या सरी (Rain in Mumbai) कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. सध्या हिवाळा सुरु आहे. परंतू, हिवाळ्यात पाऊस पडल्याने महाराष्ट्रात एक विचित्रच वातावरण पाहायला मिळाले. या वातावरणामुळे प्रामुख्याने शेतीला फटका बसण्याची चिन्हे आहेत.

कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात (Maharashtra) ढगाळ वातावरण (Cloudy weather) आहे. पुढचे एक दोन दिवस हे वातावरण असेच राहिली. त्यानंतर ते निवळत जाईल. या काळात राज्यातील काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसतील. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळू शकेल असे कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे.

मुंबईत तुरळक रिमझिम

मुंबईतही रात्री काही ठिकाणी तुरळक पाऊस पाहायला मिळला. प्रामुख्याने दादर, वरळी, वडाळा, माहिम, माटूंगा परिसरात तुरळक पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. पुढचे दोन दिवस मुंबईतील सायन, कुर्ला, वडाळा तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, बदलापूर परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळतील. (हेही वाचा, Mumbai Water Drains: आता मुंबईतील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार; पावसाळ्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी BMC खर्च करणार तब्बल 160 कोटी रुपये)

दरम्यान, रायगडसोबतच धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार आदी जिल्ह्यांतही अवकाळी पाऊस हजेरी लाऊ शकते. इतर ठिकाणीही ढगाळ वातावरणासाह रिमझीम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाचा कोकणातील अंबा पिकावर तर सांगली नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पिकावर परिणाम होऊ शकतो.