Pune: घरातील किरकोळ वादानंतर जावयाने (Son-in-Law) सासूला (Mother-in-Law) मारहाण करत तिच्या तोंडावर गरम पाणी फेकले. एवढेच नाही तर फरशीवर डोके आपटून सासूचे दोन दातही पाडले. खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर्मी क्वार्टर्समध्ये ही घटना घडली. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिंद्रा सिद्धनाथ तोरणे (वय 25) असं आरोपीचं नाव आहे. जावई महिंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सासू सुजाता कैलास शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. (हेही वाचा - Heart Attacks in Mumbai: मुंबईत COVID-19 पेक्षा हदयविकाराचा झटका, क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिंद्रा हा फिर्यादीचा जावई आहे. फिर्यादीने त्यांना घरातून बाहेर पडण्यास सांगितले होते. याचा राग येऊन आरोपीने पीडितेच्या चेहऱ्यावर गरम पाणी फेकले. पीडितेचे केस पकडून तिला जमिनीवर पाडून तिचे दोन दातही पाडले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.