Heart Attacks in Mumbai: मुंबईत COVID-19 पेक्षा हदयविकाराचा झटका, क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक
Representative Image (Photo Credits: RawPixel)

मुंबई शहरातील नागरिकांचे मृत्यू हे इतर कोणत्याही कारणांपेक्षा हृदयविकार ( Heart Attack) आणि कर्करोग (Cancer) आदी कारणांमुळे अधिक होत असल्याचे एका आकडेवारीतपून पुढे आले आहे. मुंबई महापालिकेने (BMC) दिलेल्या आकडेवारीनुसार सन 2022 मध्ये शहरात प्रतिदिन 25 ते 26 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू केवळ कर्करोग आणि हृदयविकार या दोन कारणांमुळे झाला आहे. मुंबई महापालिकेच्या नागरी आरोग्य विभागाकडून माहितीचा अधिकार (RTI) कायद्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणून गोळा केलेल्या डेटामध्ये ही माहिती पुढे आली आहे.

विशेष म्हणजे मुंबई शहरात कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण कर्करोग आणि हृदयविकार यांच्या तुलनेत अगदीच कमी आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार पाठिमागील वर्षी कोरोनामुळे 1,891 नागरिकांचा मृत्यू झाला.मुंबई महाालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, प्राणघातक समजल्या जाणाऱ्या कोविड-19 (COVID-19) विषाणूमुळे झालेल्या मृत्यूमध्ये अनुक्रमे सन 2020 (10,289), 2021(11,105 ) मृत्यू झाले. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कोविड व्यतिरिक्त हृदयविकाराचा झटका, कर्करोग, क्षयरोग आदी कारणामुळे होणाऱ्या मृत्यूंचेही प्रमाण कमी झाले आहे. गेल्या वर्षी टीबीमुळे एकूण 3,281 मृत्यू झाले होते, जे 2018 मध्ये 4,940 होते. (हेही वाचा, Heart Attack Death Rate in Women: हार्ट अटॅक पुरूषांच्या तुलनेत महिलांसाठी दुप्पटीपेक्षा अधिक जीवघेणा; 'ही' कारणं आहेत धोक्याची घंटा)

आकडेवारीनुसार, हृदयविकाराचा झटका, कर्करोग, कोरोनाव्हायरस आणि टीबी यासह इतर कारणांमुळे गेल्या वर्षी मुंबईत नागरिकांचा मृत्यू झाला. टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटलेल्या संख्येबद्दल बोलताना बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, आता टीबीची चांगली औषधे आणि रुग्णांचा चांगला मागोवा घेतला जात आहे. या घटकांमुळे आता दशकापूर्वीच्या तुलनेत कमी मृत्यू होत आहेत. दुसरीकडे, कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही उद्रेक झाल्यानंतरच्या काही वर्षांत लक्षणीय घट झाली आहे.