नागपुरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय आहे, मग तिथे कोरोनाचा कहर कसा? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सवाल
Raju Shetty And Chandrakant Patil (Photo Credit: PTI)

धारावीतील (Dharavi) कोरोना प्रसार रोखण्यात यश आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने धारावी पॅटर्नचे कौतुक केले आहे. त्यानंतर धारावीतील करोना प्रसार रोखण्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकारने केवळ भ्रष्टाचार केला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून काम केल्यामुळे करोना नियंत्रणात आल्याचा दावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला होता. जर संघाने धारावी करोनामुक्त केली, असा दावा केला जात असेल, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात करोनाचा कहर कसा झाला?, असा सवाल उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

धारावीमध्ये ज्यावेळी परिस्थिती भयावह झाली होती. माणसे मरत होती, त्यावेळी आरएसएसचे कार्यकर्ते मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर आहेत. जीव धोक्यात घालून काम करत आहेत, अशी एकही बातमी ऐकण्यात आली नाही. मात्र, ज्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली गेली आहे. त्यावेळी अनेकजण श्रेय घेण्यासाठी पुढे आले आहेत. माझ्या मनात एक छोटी शंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्येही कोरोनाचा हाहाकार झाला आहे. तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही? हे मला माहिती नाही. कारण, मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. इंचलकरंजीसह अनेक शहरात कोरोनाने थैमान घातला आहे. त्यामुळे स्वयंसेवकांनी तिथे जावे. त्यांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र करोना मुक्त करण्याचे काम करावे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल, असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष; विद्यापीठ अंतिम परीक्षा होणार की नाही याबाबत उत्सुकता

चंद्रकांत पाटील यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते की, ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत, त्याचे कौतुक केले पाहिजे. पण चुकीच्या गोष्टींवर टीका करायची नाही का? भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी कोरोनाचा केंद्र बिंदू ठरली होती. पण धारावीने कोरोनावर मात केली आहे. पण यांचे श्रेय सरकारचे नसून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगचे आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकारने केवळ भ्रष्टाचार केला आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.