Representational Image (Photo Credits: Facebook)

प्रेमाला विरोध असातानाही प्रियकरासोबत पळून जाण्याचा तयारीत असणाऱ्या 23 वर्षीय मुलीची तिच्या आईनेच हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना दक्षिण मुंबई (South Mumbai) येथील पायधुनी (Pydhonie) येथे घडली. मुलीची हत्या केल्यानंतर आईनेच स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन केले. याप्रकरणी पोलिसांनी हत्या झालेल्या तरुणीच्या आईसह तिच्या भावालाही अटक केली आहे. यात तरुणीच्या भावाचाही सहभाग असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे. तसेच पोलीसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे जवळच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

निर्मला अशोक वाघेला असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून ती संत तुकाराम रोडच्या परिसरात आपली आई आणि भावासोबत राहत होती. निर्मलाचे गेल्या काही दिवसांपासून एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. निर्मलाच्या आईचा या प्रमेसंबंधाला साफ विरोध होता. दरम्यान, निर्मलाच्या आईने अनेकदा तिची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला होता. तसेच निर्मलाने संबधित तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवू नये, असे आईचे म्हणणे होते. यावरुनच रविवारी रात्री निर्मलाचे तिच्या आईसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर निर्मलाने प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कपडे भरण्यास सुरुवात केली. हे पाहून निर्मलाच्या आईचा राग गगनाला गेला. यातून निर्मलाच्या आईने तिच्याच ओढणीने गळा आवळला. त्यानंतर स्वताच पायधुनी पोलीस ठाणे आपण आपल्या मुलीच्या हत्येची कबूली दिली. हे देखील वाचा- कोल्हापूर: बाइक आणि टेम्पो च्या धडकीने भीषण अपघात; 3 जण ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 9 च्या सुमारास निर्मलाच्या आईने पायधुनी पोलीस ठाण्यात येऊन आपल्या मुलीच्या हत्येची कबूली दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी निर्मला गंभीर अवस्थेत होती. पोलिसांनी ताबडतोब तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निर्मलाच्या आईसह भावालाही पोलिसांनी अटक केली आहे.