Lalbaug Flyover Closed for 3 Months: मुंबई महानगरपालिकेने लालबाग उड्डाणपुलावरील दुरुस्ती व बेअरिंगचे काम सुरू केले असून आजपासून 15 जूनपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजता या कालावधीत वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात उड्डाणपुलावरील वाहनांच्या वाहतूकीवर मोठा परिणाम होणार आहे. लालबाग उड्डाणपुल बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे परळ पूल आणि परळ टी. टी. जंक्शनकडून येणारी आणि भायखळ्याकडे जाणारी दक्षिण वाहिनीवरील सर्व वाहनांची वाहतूक लालबाग उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने भायखळ्याच्या दिशेने वळवण्यात आली आहे.
मुंबईच्या दक्षिण विभागाचे डीसीपी योगेश कुमार यांनी सांगितलं की, “राणी बागजवळील भायखळा बाजार ते उत्तर दिशेकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पुढील तीन महिन्यासाठी बंद ठेवण्यात येईल. या कालावधीत सुलभ वाहतूकीच्या मार्गदर्शनासाठी वाहतूक पोलिस तैनात केले जातील." (वाचा -COVID19 मुळे होळी साजरी करण्यासंदर्भात लागू करण्यात आलेल्या निर्बंधावर राम कदम यांची सरकारवर टीका)
दरम्यान, भायखळा मार्केटकडून लालबाग उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वाहतुकीलाही पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार ही वाहतूक उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने परळच्या दिशेने करण्यात येईल. यासंदर्भात योग्य मार्गदर्शक फलक लावण्यात येणार असल्याचंही योगेश कुमार सांगितलं आहे.
वाहन चालकांची तसेच प्रवाशांचा गोंधळ होऊ नये, यासाठी या मार्गावर विशेष वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार असून सूचनांचे फलकही लावण्यात येणार आहेत. उड्डाणपुलावरील दुरुस्ती व बेअरिंगचे काम सुरू असल्याकारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.