देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. अशात राज्यातील विविध ठिकाणी संचारबंदीसह लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम सुद्धा अत्यंत साधेपणाने साजरे करावेत असे आवाहन सरकारकडून करण्यात आहे. त्याचसोबत नागरिकांनी नियमांचे पालन ही करावे अन्यथा कठोर कारवाईचा इशारा दिला गेला आहे. याच पार्श्वभुमीवर दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी संदर्भातत सरकारकडून नवी नियमावली जाहिर करण्यात आली आहे. यावर आता भाजप नेते राम कदम यांनी टीका केली आहे.(महाविकास आघाडीने नैतिकता तुडवली: देवेंद्र फडणवीस)
राम कदम यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, हिंदू विरोधी महाराष्ट्रातील वसूली सरकार आता होळी साजरी करण्यासाठी सुद्धा मनाई करत आहे. पुढे त्यांनी बिअयर बार सुरु केल्यास कोरोना नाही होणार की मंदिर खुले केल्यानंतर कोरोना नाही होणार? असा सवाल उपस्थितीत केला आहे. तसेच ही कोणत्या पद्धतीची विडंबना आहे. तर हिंदू सण आले की त्यांना कोरोनाची आठवण येते. परंतु पब आणि हुक्का पार्लर तर सुरळीत सुरु आहेत तेव्हा काही होत नाही का? त्यांनी #वसूलीसरकार असे म्हणत आमच्या हिंदू सणांवर बंदी घालू शकत नाही असे ट्विटमध्ये लिहिले आहे.(BMC Guidelines for Holi 2021: यंदा मुंबईत धुलिवंदन नाही! कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी बीएमसीने जारी केले आदेश)
Tweet:
है वहा पर कुछ नहीं होता? #वसूलीसरकार हमारे हिंदू त्योहारो को रोक नहीं सकती
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) March 24, 2021
दरम्यान, सर्वत्र सध्या कोरोनाच्या लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. तर 60 वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जात असून चाचण्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे. अशातच गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 28,699 रुग्ण आढळले आहे. तर 132 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 25,33,026 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 22,47,495 जणांनी कोरोनावर मात केली असून एकूण 53,589 जणांचा मृत्यू झाला आहे.