अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण (Kokan) आणि गोवा (Goa) किनारपट्टीला क्यार चक्रिवादळाचा (Kyarr Cyclone) धोका निर्माण झाल्याचे हवामान खात्याने (Weather Department) सांगितले होते . यामुळे मुंबई (Mumbai) शहारातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. एवढेच नव्हे गोवा (Goa), सिंधुदुर्ग (sindhudurg), रत्नागिरी (Ratnagiri) आणि रायगडला (Raigad) या शहरात ढगफुटीसारखा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यातच हवामान खात्याने मुंबईवरील येणारे क्यार चक्रीवादळाचा धोका टळला असल्याची माहिती दिली आहे. हवाखात्याने दिलेल्या माहितीनंतर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अरबी समुद्रात 8 दिवसांपासून कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने या वादाळाचे चक्रिवादळात रुपांतर झाले होते. येत्या 48 तासात महाराष्ट्रातील कोकण आणि गोवा किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. परंतु, मुंबई शहरावरील क्यार चक्रीवादळाचे संकट टळले आहे, अशी माहिती हवामान खात्याने नागरिकांना दिली आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे देखील वाचा- Kyarr Cyclone: मुंबईसह राज्यात जोरदार पावसाचा अंदाज; किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग 65 किलोमीटपर्यंत जाण्याची शक्यता

शुक्रवारपासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने त्याचा फटका मच्छिमारांना बसला आहे. मालवणमधल्या देवबाग परिसरात समुद्राचे पाणी शिरले आहे.