Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांना तपासात अडथळा आणून प्रकरणातील सत्य दडपायचं हा बिहार-महाराष्ट्रातील राजकर्त्यांचा डावः संजय राऊत
Sanjay Raut (Photo Credit: ANI)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून दरदिवशी या प्रकरणासंदर्भात नवी माहिती समोर येत आहे. या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन जे काही राजकारण केले जात आहे हा महाराष्ट्र सरकारविरुद्ध आखलेला डाव आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) तपास करुन द्यायचा नाही आणि प्रकरणातील सत्य दडपायचं हा बिहार आणि महाराष्ट्रातील काही राजकर्त्यांचा डाव आहे, असं संजय राऊत म्हणाले. या प्रकरणाचं राजकारण करणं घृपास्पद असून आम्हाला त्याचं राजकारण करायचं नाही, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

थोड्याच दिवसात कोणाचे हात किती दगडाखाली आहेत, हे कळेल. मुंबईत घडलेल्या घटनेची पटना येथे तक्रार दाखल होते. त्यानंतर त्यात बिहारचे मुख्यमंत्री लक्ष घालतात. याची सीबीआय चौकशी व्हावी म्हणून तगादा लावतात. हे सर्व महाराष्ट्राविरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे. तसंच सुशांतच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिस सक्षम असून त्यातील सत्य बाहेर काढण्याचा योग्य प्रयत्न केला जात आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांवरील विश्वास अधोरेखित केला. ('सूत्रधारांना जबर किंमत मोजावी लागेल' आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांचा इशारा)

ANI Tweet:

तसंच मुंबई पोलिसांचा तपास झाल्यानंतर त्यावर टीका-टिपण्णी करा असेही राऊत म्हणाले. तसंच काही लोकं पडद्यामागून पटकथा लिहित असल्याचेही ते म्हणाले. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी 'हे तर गलिच्छ राजकारण' असं म्हणत या प्रकणावरुन होत असलेल्या टीकेला उत्तर दिले होते. दरम्यान 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊ न आत्महत्या केली होती.