Covishield Vaccine मुंबई मध्ये दाखल; परळच्या FS Ward ऑफिस मध्ये ठेवणार!
कोविशिल्ड वॅक्सिन। Photo Credits: Twitter/ BMC

भारतामध्ये 16 जानेवारी पासून कोविड 19 च्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता तयारीला सुरुवात झाली आहे. आज मुंबई मध्ये पुण्याहून कोविशील्ड लसीच्या डोस (Covishield Vaccine) ची पहिली बॅच दाखल झाली आहे. दरम्यान बीएमसी (BMC) च्या विशेष गाडीने या लसीचे डोस मुंबई मध्ये आणण्यात आले आहेत. सीरम इंस्टिट्युटकडून आता लसीच्या वितरणाला सुरूवात झाली आहे. काल त्यांनी 13 शहरांमध्ये लस पाठवायला सुरूवात केल्यानंतर याबाबत आनंद व्यक्त केला होता. Covishield Price: SII कोविशिल्ड लस खाजगी बाजारात 1000 रूपयांना तर GoI ला पहिले 100 Mn डोस प्रति 200 रूपयांना विकणार.

बीएमसीकडे सध्या कोविशिल्ड लसीच्या 1,39,500 डोसेसचा साठा आहे. मुंबईत ही कोविशिल्ड लस सध्या एफ साऊथ विभागात परळ मध्ये ठेवण्यात आली आहे. प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी यामधून लसी केंद्रावर पोहचवल्या जाणार आहेत. मुंबईत 72 बुथ आहे. परळ हे मुंबईतील मध्यावर्ती ठिकाण आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात लस साठवून ठेवण्याची यंत्रणा मुंबई पालिकेने सज्ज ठेवली आहे. नुकतीच लसीकरणासाठी ड्राय रन घेण्यात आली आहे. मुंबईमध्ये 14 हजार जणांना एका दिवशी लस देण्याची क्षमता आहे. Covid 19 Vaccination: महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; लसीचे 9 लाख 63 हजार डोस प्राप्त, 36 जिल्ह्यांमध्ये 511 ठिकाणी दिली जाणार लस.

पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्धे यांना लस दिली जाणार आहे. नंतर टप्प्याटप्याने इतरांना दिली जाणार आहे. त्यासाठी को विन सिस्टमचा वापर केला जाणार आहे.