Final Year MBBS Exam: मुंबईत 8 मार्चपासून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात होणार; जाणून घ्या सविस्तर वृत्त
Representational Image (Photo Credits: pixabay)

Final Year MBBS Exam: मुंबईत एमबीबीएसची अंतिम वर्षाची परीक्षा 8 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षा केवळ ऑफलाइन मोडमध्ये घेण्यात येतील. ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य नसल्याचं, महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेस (Maharashtra University of Health Sciences, MUHS) ने म्हटलं आहे. राज्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता पालकांनी परीक्षा ऑनलाइन करण्याचे आवाहन केले होते. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने एमयूएचएस ऑनलाईन परीक्षा घेण्यास नकार दिला.

या संदर्भात एमयूएचएस परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी एका मीडिया रिपोर्ट अहवालात म्हटले आहे की, राज्यभरात विविध प्रकारची क्षेत्रे आहेत, ज्यात बरीच महाविद्यालये दुर्गम, डोंगराळ भागात आहेत. या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण निर्णाम होऊ शकते. त्यामुळे केवळ ऑफलाइन परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. (वाचा - UGC NET Exam 2021: यूजीसी-नेट परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, कुठे भराल अर्ज?)

महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेज (MHSHS) नुकतीच एमबीबीएससह इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांसाठी यूजी अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक रीशेड्यूल केले आहे. यापूर्वी या परीक्षा 28 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार होत्या. परंतु, आता या परीक्षा 8 मार्चपासून सुरू होणार आहेत. राज्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. त्याचबरोबर आधीच ठरलेल्या वेळापत्रकानुसार प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा 23 मार्चपासून सुरू होतील.

या संदर्भात एमयूएचएस परीक्षेचे नियंत्रक अजित पाठक यांनी सांगितले की, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. परंतु, आता या परीक्षा घेण्यात येणार आहेत. एमबीबीएस अंतिम वर्षाच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.