फेब्रुवारी महिन्यात यूजीसी नेट परीक्षेच्या (UGC NET Exam 2021) तारखा घोषित करण्यात आल्या. UGC NET 2021 Exam घोषणा झाली. त्यानंतर 2 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. आज या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे. मे महिन्यात UGC NET परीक्षा होणार आहे. 2 फेब्रुवारी ते 2 मार्च हा या परीक्षेसाठी अर्ज भरण्याचा कालावधी आहे. तर 3 मार्चपर्यंत या परीक्षेची फी भरण्याची मुदत असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन त्यानुसार अर्ज भरावा.
केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी आज ( 2 फेब्रुवारी) UGC NET exam 2021 च्या तारखा जाहीर केल्या आहेत.त्यांच्या ट्वीटनुसार, National Testing Agency यंदा 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 मे 2021 दिवशी युजीसी नेट परीक्षा घेणार आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून Junior Research Fellowship आणि Assistant Professor साठी उमेदवार निवडले जातात. दरम्यान ही परीक्षा पूर्णपणे कम्प्युटर बेस्ड टेस्टच्या माध्यमातून घेतली जाणार आहे तर याबाबतची अधिक माहिती, रजिस्ट्रेशन ugcnet.nta.nic.in वर उपलब्ध असेल.हेदेखील वाचा- UGC NET 2021 Exam Dates: JRF, Assistant Professor साठी यंदाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ugcnet.nta.nic.in वर रजिस्ट्रेशन सुरू
युजीसी नेट परीक्षा ही 3 तासांची असते. पेपर 1 हा 100 मार्कांचा तर पेपर 2 हा 200 मार्कांचा असतो. दरम्यान या परीक्षेबाबतच्या अधिक अपडेट्ससाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देत रहा.
सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत पेपर होतील. पेपर सुरू होण्यापूर्वी 1 तास अगोदर उमेदवारांना परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.
दरम्यान युजीसी नेट परीक्षेचं आयोजन हे कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर यांची पात्रता आणि ज्यूनियर रिसर्च फेलोशीप यांच्यासाठी केली जाते. डॉ. पोखरियाल यांनी परीक्षांच्या तारखांची माहिती देतानाच विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.