Mumbai News: मुंबईतील वर्सोवा किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात बोट उलटल्याने दोन मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती अग्निशमन अधिकाऱ्यांनी रविवारी व्यक्त केली. शनिवारी रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान या दोघांनी आणि अन्य एका व्यक्तीने वर्सोवा भागातील देवाचीवाडी येथून मासेमारीसाठी बोट समुद्रात सोडली. धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संध्याकाळी तिघे जण बोट घेवून मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले होते परंतू पाण्याच्या वेगाने बोट उलटली. तिघेही समुद्रात बुडाले. दरम्यान एका व्यक्तीने स्वत:चा जीव कसाबसा वाचवत किनाऱ्या जवळ पोहचला.
स्थानिकांना ही माहिती मिळताच पोलीसांना खबर दिली.पोलीस आणि बचावकार्य दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक आणि पोलिसांच्या हवाल्याने अधिकाऱ्याने सांगितले की, समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे दोन-तीन किमी अंतरावर बोट पाण्यात उलटली. विजय बामानिया (35) या व्यक्तींपैकी एकाने पोहून सुरक्षितता मिळवली, असे त्यांनी सांगितले.अधिकाऱ्याने सांगितले की, उस्मानी भंडारी (22) आणि विनोद गोयल (45) हे दोघे बेपत्ता आहेत. अग्निशमन दल, पोलीस, नौदल आणि जीवरक्षक बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहेत, असेही ते म्हणाले.
शनिवारी रात्रीच्या दरम्यान या दोघांनी आणि अन्य एका व्यक्तीने वर्सोवा येथून मासेमारीसाठी बोट समुद्रात सोडली. आणि दुर्घेटनेत बोड पाण्यात बुडाली, दोनजण बेपत्ता झाले. बराच उशीरा शोध मोहिम सुरु असल्याचे पोलीसांनी माध्यमांना सांगितले. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दोघांचा शोध अद्यापही लागला नाही. पोलीसांना बेपत्ता झाल्याचे घोषित केलं आहे. त्यामुळे कुटूंबातील लोकांना आक्रोश सुरु केला.