Maharashtra Coronavirus Update: राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट सापडल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली; आरोग्य मंत्र्यांनी नागरिकांना दिला मास्क वापरण्याचा सल्ला
Uddhav Thackeray | (Photo Credit: Twitter)

Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे ठाकरे सरकारची (Thackeray Government) चिंता वाढली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांतील लोकांना आरोग्य मंत्र्यांनी विशेष आवाहन केले आहे. त्यांना अतिरिक्त खबरदारी घेण्यास तसेच मास्क घालण्यास सांगण्यात आले आहे.

शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 529 नवे रुग्ण आढळले. मात्र, या साथीच्या आजारामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. अधिकृत आकडेवारीनुसार, शुक्रवारी राज्यात 536 नवीन प्रकरणे आणि शून्य मृत्यूची नोंद झाली. (हेही वाचा -Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात पहिल्यांदाच सापडले BA.4, BA.5 व्हेरिअंटचे रुग्ण; 4 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश)

महाराष्ट्र सरकारने गेल्या महिन्यात राज्यात मास्क घालण्याची अनिवार्यता काढून टाकली होती. राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी सांगितले की, महाराष्ट्रात प्रथमच BA4 उप-प्रकारचे चार रुग्ण आढळले आहेत. तसेच ओमिक्रॉनच्या नवीन सब-व्हेरियंट BA5 ची तीन प्रकरणे देखील आढळून आली आहेत. आरोग्यमंत्री टोपे यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले की, व्हायरसमुळे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत.

राजेश टोप यांनी सांगितलं की, "ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत, तेथे लोकांनी मास्क घालण्यासह अतिरिक्त काळजी घेणे सुरू केले पाहिजे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. ती अजूनही नियंत्रणात आहे. आरोग्य अधिकार्‍यांना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."

दरम्यान, शनिवारी मुंबईत 330 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले. त्यानंतर शेजारच्या ठाणे शहरात 38, पुणे 32 आणि नवी मुंबई 31 प्रकरणे आहेत. शेजारील उप-शहरे आणि महानगरपालिकांचा समावेश असलेल्या मुंबई परिमंडळात कोविड-19 चे 448 रुग्ण आढळले आहेत. तर पुणे परिमंडळात 64 संसर्गाची नोंद झाली आहे.