Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात पहिल्यांदाच सापडले BA.4, BA.5 व्हेरिअंटचे रुग्ण; 4 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Maharashtra Coronavirus Update: राज्यात शनिवारी पुण्यातील सात प्रकरणांमध्ये ओमिक्रॉन स्ट्रेन (Omicron Strain) च्या BA.4 आणि BA.5 उपप्रकारांसह कोविड-19 संसर्गाच्या (Covid-19 Infection) पहिल्या प्रकरणांची नोंद झाली. राज्याच्या आरोग्य विभागाच्या संपूर्ण जीनोमिक सिक्वेन्सिंगच्या अहवालानुसार, पुण्यात BA.4 प्रकारातील 4 रुग्ण आणि BA.5 प्रकारांचे 3 रुग्ण आढळून आले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी पत्रकारांना सांगितले की, "आम्ही जिल्हा प्रशासनांना चाचण्या वाढवण्यास तसेच प्रकरणांच्या क्लस्टरसाठी सतर्क राहण्यास सांगितले आहे." राज्यात आज आढळलेले बी ए. व्हेरियंटचे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहे. यामध्ये चार पुरूषांचा आणि तीन महिलांचा समावेश आहे. सर्व रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. सर्व रुग्णांना घरगुती विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे. (हेही वाचा - Monkeypox Virus Test: भारतीय कंपनीला मोठं यश; मंकीपॉक्स विषाणूची चाचणी करण्यासाठी RT-PCR किट तयार)

भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) ने देखील तमिळनाडू आणि तेलंगणामध्ये BA.4 आणि BA.5 प्रकारांसह प्रकरणे आढळून आल्याची पुष्टी केली आहे. तथापि, अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप चिंतेचे कारण नाही. कारण, हा व्हेरिएंट ओमिक्रॉन प्रकाराची एक स्ट्रेन आहे.

BA.4 आणि BA.5 हे चिंतेचे कारण आहेत का?

ओमिक्रॉनचे BA.4 आणि BA.5 उपप्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे. BA.4 प्रकार प्रथम 10 जानेवारी 2022 रोजी लिम्पोपो, दक्षिण आफ्रिकेमध्ये गोळा केलेल्या नमुन्यातून आढळून आला आणि BA.5 प्रथम 25 फेब्रुवारी रोजी क्वाझुलु-नताल येथे आढळला. दोन्ही ओमिक्रॉन प्रकाराचे व्हेरिएंट असले तरी दोन नवीन VOCs मध्ये BA.2 स्ट्रेनमध्ये BA.1 पेक्षा अधिक साम्य आहे, जे दक्षिण आफ्रिकेत अधिक व्यापक होते.