Indurikar Maharaj (PC - Facebook)

Indurikar Maharaj on YouTubers: माझ्या भाषणाचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील,’ असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) केलं आहे. यापूर्वी इंदुरीकर महाराजांनी माझ्या भाषणांचे व्हिडिओ परवानगी घेतल्याशिवाय यूट्यूबवर अपलोड करून नका, असा इशारा दिला होता. आता त्यांनी त्यांच्या किर्तनाचे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करणाऱ्या यूट्यूबर्संना एक प्रकारचा श्राप दिला आहे.

यापूर्वी इंदुरीकर महाराज अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या अडचणी वाढण्याचं कारण त्यांनी यूट्यूबर्स असल्याचं सांगितलं आहे. अकोल्यातील कौलखेड भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमानिमित्त इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित केलं होतं. (वाचा - Aditya Thackeray यांचे निकटवर्तीय Rahul Kanal यांच्या घरावर आयकर विभागाची धाड)

या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज म्हणाले, 'माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून आतापर्यंत 4 हजार लोकांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांना पैसे मोजायलाही वेळ नाही. त्यांच्यामुळे मी सतत अडचणीत येत आहे. माझ्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील.' त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी पुत्रप्राप्ती संबंधी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. आता यूट्यूबर्स संदर्भात केलेल्या नवीन वक्तव्यामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.