विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नवी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून परीक्षा न घेण्याची भूमिका मांडण्यात येत आहे. यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केंद्र सरकारला परीक्षा न घेण्याचं आवाहन केलं आहे. 'केंद्रसरकार अजून कसली वाट बघत आहे. केरळ सरकारने घेतलेल्या अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेत विध्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली, असे पुढे आले आहे. केंद्रसरकारने भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा,' असं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे.
दरम्या, केरळ सरकारने काही दिवसांपूर्वी अभियांत्रिकी, आर्किटेक्चर आणि वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा घेतली होती. या परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्याचबरोबर केरळ सरकारने जवळपास परीक्षेला बसलेल्या 600 विद्यार्थ्यांच्या पालकांवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. (हेही वाचा - Maharashtra Board 10th Result Date: दहावीचा निकाल तारीख आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता; mahresult.nic.in वर पाहू शकाल मार्क्स!)
आत्ता केंद्रसरकार अजून कसली वाट बघत आहे.. कर्नाटक सरकारने घेतलेल्या अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेत विध्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असे पुढे आले आहे..केंद्रसरकारने भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा. pic.twitter.com/HezY3QO9JA
— Uday Samant (@samant_uday) July 23, 2020
उदय सामंत यांनी या बातमीचा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केला आहे. केंद्र सरकार अजून कसली वाट बघत आहे. केरळ सरकारने घेतलेल्या अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेत विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यामुळे केंद्र सरकारने भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा,' असं आवाहन उदय सामंत यांनी केंद्र सरकारला केलं आहे.