महाराष्ट्रात 16 जुलै दिवशी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या यंदाच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महाराष्ट्रात कोरोना संकटकाळात पार पडलेल्या 10वीच्या परीक्षांचा निकाल यंदा 31 जुलै पर्यंत जाहीर करू असा मानस शिक्षण मंडळाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान त्याला शालेय शिक्षणम6त्री वर्षा गायकवाड यांनीदेखील दुजोरा दिला आहे. मात्र अद्याप निकालाची तारीख जाहीर झालेली नाही.दरवर्षीप्रमाणे निकालाच्या तारखेच्या आदल्या दिवशी काही तासांपूर्वी त्याची घोषणा होते. त्यामुळे यंदाही 31 जुलैपर्यंत निकाल लागणार असेल तर येत्या आठवड्याभरात शिक्षण मंडळ 10 वी निकालाची तारीख जाहीर करू शकते. दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांचे गुण ऑनलाईन माध्यमातून mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येतात. तर मार्क्सशीट शाळेत उपलब्ध होइल. त्यासाठी लवकरच गाईडलाईन्स जारी केल्या जातील.
महाराष्ट्रात यंदा 10वीच्या परीक्षेला सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली आहे. कोरोनाची दहशत असल्याने भूगोलाचा पेपर यंदा रद्द करण्यात आला आहे. या विषयाचे मार्क्स विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीने दिले जाणार आहेत अशी घोषणा मंडळाने केली आहे. त्यामुळे यावर्षीचा निकाल आणि प्रवेश प्रक्रिया याबाबत विद्यार्थी, शिक्षक यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. Maharashtra FYJC Online Admission 2020: 11 वी प्रवेशप्रक्रियेला 26 जुलै पासून होणार सुरूवात, वेळापत्रकात बदल; SSC विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता.
10 वीचा निकाल कसा पहाल?
- निकाल पाहण्यासाठी प्रथम mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या
- Board Results ऑप्शनवर क्लिक करा
- MSBSHSE रिजल्ट पेज तुमच्या समोर सुरु होईल
- विद्यार्थ्याने त्याचा क्रमांक आणि अन्य तपशील द्यावा
- रिजल्ट पाहण्यासाठी तेथे देण्यात आलेल्या ऑप्शनवर क्लिक करावे
- रिजल्ट दिसल्यावर तो डाऊनलोड देखील करता येईल.
दरम्यान 26-27 जुलै दिवशी 11वी च्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेमधील फॉर्मचा भाग 1 भरायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना अत्यावश्यक माहिती भरायची आहे. तसेच यंदा प्रवेशप्रक्रिया वेगवान करून ऑगस्ट महिन्यात ती पूर्ण करून सप्टेंबर महिन्यात वर्ग सुरू करण्याचादेखील मानस व्यक्त करण्यात आला आहे.