Amaravati: धक्कादायक! अमरावती येथील जंगलात आढळला अल्पवयीन मुलगा-मुलीचा मृतदेह, 13 मेपासून होती बेपत्ता
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

अमरावती (Amravati) शहराच्या महादेव खोरी (Mahadev Khori) परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या परिसरातील वनविभागाच्या राखीव जंगलात अल्पवयीन मुलगा-मुलीचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे दोन्ही मुले मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होती. तर, त्यांचे मृतदेह गेल्या तीन-चार दिवसांपासून लटकलेले असावेत, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच ही आत्महत्या आहे की घातपात आहे? याचा पोलीस कसून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर कांबळे (वय, 17) आणि गायत्री (वय, 16) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही अमरावतीतील रहिवाशी आहेत. मयुर आणि गायत्री 13 मे पासून बेपत्ता होती. यासदंर्भात गायत्रीच्या कुटुंबियांनी 13 मे ला राजापेठ ठाण्यात तक्रार दिली होती. तर, मयुरच्या कुंटुंबियांनी 14 मे रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु, गुरुवारी (20 मे) दोघांचा मृतदेह महादेव खारी परिसरातील एका जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या दोघांचा मृतदेह खाली उतरला. दोन्ही मृतदेह मागील तीन ते चार दिवसांपासून लटकलेल्या अवस्थेत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे याप्रकरणात पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- Maharashtra Weather Forecast: येत्या 2-3 दिवसांत मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता- IMD

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, मयूर आणि गायत्री यांच्या मृत्युनंतर या दोघांच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. परंतु, त्यांनी आत्महत्या केली आहे की, त्यांचा घातपात झाला आहे? याचा पोलीस प्रशासन शोध घेत आहेत. तसेच्या त्यांच्या नातेवाईकांचीही विचारपूस करत आहेत.