Maharashtra: रुग्णालयातील आगीच्या घटनांसाठी प्रशासन जबाबदार, राज्य सरकारकडून परिपत्रक जारी
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला काही दिवसांपूर्वी आग लागल्याने अनेक बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नागपूर येथील वाडी परिसरातील खाजगी रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. ज्यात अनेकांनी प्राण गमावले होते. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. वीज पुरवठ्याच्या संदर्भात अधिक काळजी व उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य सरकारने शासकीय व खासगी रुग्णालयांच्या संचालकांना दिलेले आहेत.

कोविड काळात रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, जनित्र संच तसेच इन्व्हर्टरच्या माध्यमातून अंतर्गत वीज पुरवठा उपलब्ध करणे, ऑपरेशन थिएटर, आयसीयू येथील वातानुकूलित यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विद्युत उपकरणांची निगा व देखभाल योग्य रितीने करण्याच्या संदर्भात रुग्णालयांना शासनाने दिशानिर्देश दिलेले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus In Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ, पाहा आजची ताजी आकडेवारी

ट्वीट-

रुग्णालयात अंतर्गत वीज संचमांडणीच्या सुरक्षेसोबतच वीज पुरवठ्याची अखंडता तेवढीच महत्त्वाची आहे. अखंडीत वीज पुरवठा राखण्याची रुग्णालय प्रशासन तसेच पुरवठादार कंपनीची सामूहिक जबाबदारी राहणार आहे.