Thane: गणेशोत्सवादरम्यान ठाणे येथील लसीकरण पाच दिवस बंद राहणार
Coronavirus Vaccine (Photo Credits: ANI)

Thane Vaccination Update: ठाणे महापालिकेने मंगळवारी लसीकरणासंदर्भात महत्वाची सुचना जाहीर केली आहे. त्यानुसार गणेशोत्साच्या पार्श्वभुमीवर पाच दिवस लसीकरण बंद राहणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे. यंदा गणेशोत्सव 10 सप्टेंबर पासून साजरा केला जाणार आहे. तर ठाण्यातील सर्व लसीकरण केंद्रे ही सप्टेंबर 10,11, 14,16 आणि 19 तारखेला बंद असणार आहे.(Maharashtra: राज्यात तिसरी लाट येण्याचा दावा, नागपुरात दुकानांच्या वेळात घट तर मुंबई-पुण्यात निर्बंध कठोर होण्याची शक्यता)

लसीकरण बंद असल्याने नागरिकांनी याबद्दल माहित करुन घ्यावे. तर मंगळवारी ठाण्यात 10,89,125 जणांचे लसीकरण झाले. तसेच तलावाच्या ठिकाणांवरील परिसरात हलक्या स्वरुपात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

ठाणे हे सांस्कृतिक शहर असल्याने प्रत्येक घरात गणेशोत्सव साजरा केला जातो. अशा उत्सवात, लसीकरणासाठी घराबाहेर पडणारे नागरिक चांगले नाहीत. तसेच, यामुळे त्यांना गैरसोय होऊ शकते. म्हणून आम्ही सर्व लसीकरण केंद्रे पाच वेगवेगळ्या दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने महापौर नरेश म्हस्के  यांनी म्हटले.(Mumbai Fresh COVID 19 Guidelines For Ganesh Chaturthi 2021: यंदा मुंबईत घरगुती,सार्वजनिक गणेशोत्सवात 'या' नियमावलीचं असेल गणेशभक्तांवर बंधन)

गेल्या काही महिन्यात सुद्धा विविध सण आल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. त्याचसोबत लसीकरणाचा अपुरा साठा आणि लस संपल्याने ही लसीकरण बंद असल्याचे सूचना फलक लावण्यात आले होते.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये आगामी सणासुदीचा काळ पाहता आता पुन्हा कोरोना रूग्णसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गणपती पासून सुरू होणारे आगामी सण पाहता काही निर्बंधांवर वाढ करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन वैद्यकीय परिषदेमध्ये बोलताना मागील वर्षी प्रमाणे यंदा कोरोना संकटात रूग्णवाढ सणानंतर आटोक्यात ठेवण्यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांनाही 'अनावश्यक गर्दी' टाळण्याचं, राजकीय समारंभ न कारण्याचं आवाहन केले आहे.