Photo Credits: ANI

Maharashtra: देशभरात कोरोना व्हायरसची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच महाराष्ट्रातून रुग्णांचा जो आकडा समोर येत आहे त्यामुळे आता सर्वांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात अचानक रुग्ण वाढ झाल्याने सरकारने दावा केला आहे की, राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी असे म्हटले की, तिसरी लाट येणार नाही तर ती आली आहे.(Covid-19 Third Wave: मुंबईमध्ये आली कोरोना विषाणूची तिसरी लाट; गणेशोत्सवात काळजी घेण्याचे Mayor Kishori Pednekar यांचे आवाहन)

गेल्या काही दिवसांत मुंबईतील रुग्णसंख्या पाहता 30 ऑगस्टला एका दिवसात 334 नवे रुग्ण आढळले होते. तर 2 जणांचा बळी गेला होता. त्याचसोबत 31 ऑगस्टला सुद्धा आकडा 323 आणि एकाचा मृत्यू झाला होता. तर सप्टेंबर मध्ये सुद्धा अशाच पद्धतीची रुग्णसंख्या समोर येत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असून नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. शहरातील विविध बाजारांमध्ये लोकांची मोठी गर्दी होत आहे.(Mumbai Fresh COVID 19 Guidelines For Ganesh Chaturthi 2021: यंदा मुंबईत घरगुती,सार्वजनिक गणेशोत्सवात 'या' नियमावलीचं असेल गणेशभक्तांवर बंधन)

अचानक रुग्णांची वाढ झाल्याने सरकार आणि प्रशासनान अलर्ट झाले आहे. त्याचसोबत यावर उपाय योजना करण्याची सुद्धा तयारी सुरु केली आहे. नागपुरात ही निर्बंध लागू करण्यात आले असून रेस्टॉरंट संध्याकाळी 8 वाजता आणि दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु असण्यास आहे. मुंबई आणि पुण्यात सुद्धा ज्या प्रकारे नागरिक बेजबाबदार पणे वागत आहेत. त्यामुळे येथे सुद्धा लवकरच निर्बंध पुन्हा लागू केले जाण्याची शक्यता आहे.