Thane Traffic Update: घोडबंदर रोड वर केमिकल टॅन्कने भरलेला ट्रक पलटला; ट्राफिक जॅम
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

ठाण्याच्या (Thane)  घोडबंदर रोड (Ghodbandar Road) वर आज केमिकल टॅन्क्स घेऊन जाणारे ट्र्क पलटी झाले आहे. मंगळवार सकाळी झालेल्या या अपघातामुळे काही काळ ट्राफिक जॅम झाले होते. अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

ठाण्यात या अपघातानंतर रस्त्यावर hydrogen peroxide सांडलं होते. त्यामुळे उग्र वास येत होता. Regional Disaster Management Cell कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 23,000 लीटर हायड्रोजन पॅरॅक्सॉईड घेऊन जात होते. 20 स्टोरेज टॅन्क घेऊन जाणारा हा ट्रक गुजरात ते न्हावा शेवा प्रवास करत होता. सकाळी 7.15 वाजता ठाणे खाडी वर हा अपघात झाला आहे. नक्की वाचा: ठाण्यात खड्ड्याने घेतला एका बाईकस्वाराचा बळी; Kashimira पोलिस स्टेशन मध्ये अपघाती मृत्यूची नोंद. 

ट्रॅकचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेड आणि RDMC ची टीम दाखल झाली आहे. ट्रक पुन्हा सरळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. केमिकल लीक मुळे कोणालाही त्रास झालेला नाही.