Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

ठाणे (Thane) शहरातील नेहमीच गजबज असलेल्या घोडबंदर रोडवर (Ghodbunder Road) मंगळवारी सकाळी रसायनाच्या टाक्या वाहतूक करणारा कंटेनर ट्रक उलटला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक कोंडी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टॅंकर उलटल्यानंतर रस्त्यावर हायड्रोजन पेरॉक्साईड रसायन (Chemical- Hydrogen Peroxide) मोठ्या प्रमाणावर सांडले आणि दुर्गंधी पसरली

ठाण्यातील नागरी आणि प्रादेशीक आपत्ती व्यवस्थापन (आरडीएमसी) कक्षात काम करणाऱ्या एका अधिकऱ्याने सांगितले की, कंटेनर ट्रक गुजरातमधून न्हावा शेवा येथे 20 साठवण टाक्यांमधून 23,000 लिटर हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन जात असताना सकाळी 7:15 च्या सुमारास गायमुख खाडीजवळ उलटला. या घटनेत चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, ठाण्यात खड्ड्याने घेतला एका बाईकस्वाराचा बळी; Kashimira पोलिस स्टेशन मध्ये अपघाती मृत्यूची नोंद)

ठाणे नागरी संस्थेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या (आरडीएमसी) एका अधिकाऱ्याने सांगितले की, कंटेनर गुजरातमधून न्हावा शेवा येथे 20 साठवण टाक्यांमधून 23,000 लिटर हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन जात असताना सकाळी 7:15 च्या सुमारास गायमुख खाडीजवळ उलटला. या घटनेत चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि आरडीएमसीचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि झुकलेल्या कंटेनरला पुन्हा योग्य स्थितीत नेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. रासायनिक गळतीमुळे कोणालाही बाधित झाल्याची कोणतीही घटना घडल्या चेहीत्यांनी सांगितले.