Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

घडाळ्याच्या काट्यांवर धावणारे मुंबईकर लोकल पकडण्यासाठी घाई करत असल्याचे दिसून येते. तर मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची दिवसभर गर्दीच असल्याने त्याचा नाहक त्रास नेहमीच सहन करावा लागतो. याच पार्श्वभुमीवर आज सकाळच्या वेळेस कळवा-मुंब्रा दरम्यान तिघेजण लोकलमधून ट्रॅकवर पडल्याची घटना घडली. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अन्य दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

अपघातात जखमी झालेले प्रवासी हे मुंब्रा येथील राहणारे आहेत. तर लोकलमध्ये सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. त्याचवेळी गर्दीमुळे तिघेजण लोकलमधून पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. कल्याण येथून ही लोकल आली होती पण त्यामध्ये अतिशय गर्दी झाल्याने काही प्रवाशी लोकल बाहेर फेकले गेले.(लग्नपत्रीका वाटण्यासाठी पुणे येथून मुंबई शहरात आलेल्या वरबापाचा लोकलमधून पडून मृत्यू)

तर काही दिवसांपूर्वीच डोंबिवली - कोपर स्थानकादरम्यान चार्मी पासड (Charmi Pasad) या तरूणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. डोंबिवली स्थानकात सकाळच्या वेळेस गर्दी ऑफिसला लेटमार्क लागू नये म्हणून चार्मी घाईत चढली. गर्दीतून आत जाण्याचा तिने प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला आणि ती हात निसटून खाली पडली. जखमी अवस्थेमध्ये असलेल्या तरूणीला तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिला रूग्णालयात नेले मात्र तिला मृत घोषित करण्यात आले होते.