Thane: दिवा येथील साबा गावातील 'गणेश तलावा'त सापडला 33 वर्षीय महिलेचा मृतदेह; तपास सुरु
Death (Photo Credits-Facebook)

शुक्रवारी सकाळी ठाणे (Thane) जिल्ह्यातील एका तलावात 33 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (RDMC) प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की, दिवाच्या साबा गावातील गणेश तलावात (Ganesh Lake) दुपारी 1.30 च्या सुमारास एक मृतदेह तरंगताना आढळला. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि आरडीएमसीचे पथक पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, मृतदेहाची ओळख सीमा चंद्रकांत कांबळे अशी करण्यात आली असून, त्या मुंब्रा देवी कॉलनी येथील रहिवासी आहे. सध्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे. (हेही वाचा: Mumbai Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरी पाठवले Sex Toys, मुंबईतील तरुणास अटक)

दरम्यान, याआधी उल्हासनगर येथे आपल्या 25 वर्षीय पत्नीचा गळा दाबून खून करणे आणि नंतर तिचा मृतदेह घरातच जाळल्याच्या आरोपाखाली ठाणे पोलिसांनी एका 26 वर्षीय पतीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने दिशाभूल करण्यासाठी, मृतावर रॉकेल टाकले. घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. त्यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली.