Jitendra Awhad: घड्याळाचे काटे कमळासोबत धनुष्यालाही बोचले; जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
NCP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ठाण्यामध्ये गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने भाजप (BJP), एमआयएम (MIM० आणि शिवसेना (Shiv Sena) अशा तिन्ही पक्षांना एकदमच धक्का दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अशा जवळपास 150 जणांचा पक्षप्रवेश पार पडला. त्यामळे महाविकासआघाडीत असतानाही स्थानिक पातळीवर मात्र पक्षवाढीसाठी राष्ट्रवादी जोरदार प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने कल्याण पश्चिमेतील मुस्लीम महोल्ल्यामधून जवळपास 90 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश नेते प्रमोद हिंदुराव, आनंद परांजपे, कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील, प्रवक्ते महेश तपासे आदि नेते उपस्थित होते. (हेही वाचा, Pandharpur By-Election: कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश जवळपास नक्की, भाजपला धक्का)

कोणाचा पक्षप्रवेश

  • उर्मिला गोसावी (नगरसेविका, शिवसेना)
  • सुनीता खंडागळे (नगरसेविका, भाजप)
  • तन्झिला आयाज मौलवी(नगरसेविका, एमआयएम)
  • फैजल जलाल (नगरसेवक, काँग्रेस)
  • कुणाल पाटील (नगरसेवक, अपक्ष)

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे राजकीय व्यूहरचणेचा भाग विचारात घेता आपोआपच या पक्षप्रवेशांना मोठे महत्त्व प्राप्त होते. पाठिमागच्या वर्षी शिवसेनेने राजकीय बांधणी करत पालिका हद्दीतील भाजपचे सात नगरसेवक गळाला लावले. त्यानंतर राष्ट्रवादीनेही गळ टाकला आणि काँग्रेस, भाजप, एमआयएम, शिवसेना, अपक्ष असे धक्के देत आपले संख्याबळ वाढवले. राष्ट्रवादीने पक्षवाढिच्या दृष्टीने काही महिन्यांपासूनच प्रयत्न सुरु केले होते. त्याचा परिणाम आज पाहायला मिळाला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेतील अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. नाराज कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांपैकी काहींनी राजीनामे दिले आहेत. तर काही पक्षातच आहेत. आगामी काळात हे कार्यकर्ते काय भूमिका घेतात यावर इतर पक्षांचा डोळा आहे.